मुसळधार पावसामुळे लिंबागणेश ते बोरखेडा रस्ता खचला वाहतूक बंद, दुरुस्तीसाठी नागरिक आक्रमक
Beed, Beed | Sep 27, 2025 बीड तालुक्यातील लिंबागणेश ते बोरखेडा हा महत्त्वाचा मार्ग गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे खचून गेला आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या रस्त्याद्वारे दुध-दुभते, भाजीपाला, शेतीमाल बाजारात नेण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. इतकेच नव्हे तर आजारी रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठीसुद्धा ग्रामस्थांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.