केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील विविध गंभीर प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी मस्साजोग, जि. बीड येथील सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी ठाम मागणी केली. तसेच बीड जिल्ह्यातील स्व. महादेव मुंडे यांच्या खूनप्रकरणी तपासात होत असलेल्या दिरंगाईकडे लक्ष वेधून, मारेकऱ्यांना तातडीने अटक करून कायद्यानुसार कठोर शिक्षा द्यावी, अशी भूमिका खा.निलेश लंके यांनी मांडली.