भंडारा जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या 29 नोव्हेंबर रोज शनिवारला दुपारी 2 वाजता दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भव्य जाहीर सभेचे आयोजन भंडारा शहरातील दसरा मैदान येथे करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे या सभेत नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक पदाच्या भाजप उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत. या महत्त्वाच्या सभेच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता दरम्यान आमदार परिणय फुके यांनी स्वतः सभेस्थळी जाऊन पाहणी केली.