गंगापूर: वाहेगावचा तरुण गावठी कट्टा घेऊन फिरताना पकडला — गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
अवैधरीत्या गावठी कट्टा (पिस्टल) आणि दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या वाहेगाव येथील तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई ११ ऑक्टोबर रोजी वायगाव–मुददेशवडगाव रस्त्यावरील पाझर तलावाच्या पुलाजवळ करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, एक इसम विनाक्रमांकाच्या मोटारसायकलवरून फिरत असून त्याच्याकडे अवैध गावठी कट्टा आहे.