गडचिरोली: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी ची बैठक पक्ष कार्यालयात संपन्न
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी ची बैठक पक्ष कार्यालयात 15 सप्टेंबर ला घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्ष स्थानी वडसा तालुक्याचे तालुका सचिव कॉम्रेड. परसराम आदे होते. या मिटिंगमध्ये जिल्हा सचिव कॉ. अमोल मारकवार यांनी संध्याची राजकिय व सामाजिक परिस्थिती वर मार्गदर्शन केले.