तिरोडा: पिंडकेपार येथे राष्ट्रवादीचे कार्यक्षम नेते जगदीश बावनथडे यांच्या हस्ते दंडार कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न
Tirora, Gondia | Oct 29, 2025 सामाजिक कार्यासोबतच सांस्कृतिक मूल्यांची नेहमीच जपणूक करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यक्षम तिरोडा तालुकाध्यक्ष तथा जनसामान्यांचे जिल्हा परिषद सदस्य जगदीश बालू बावनथडे यांच्या हस्ते पिंडकेपार येथील नवयुवक नाट्य कला मंडळाच्या दंडार कार्यक्रमाचे दिमाखदार उद्घाटन करण्यात आले.दि. 29 ऑक्टोंबर रोज बुधवारला, दिवाळीतील नवमीच्या शुभदिनी सायं 5.00 वाजता या सांस्कृतिक सोहळ्याचा शुभारंभ झाला.