जागेच्या जुन्या भांडणाच्या कारणावरून मुलासह त्याच्या आईला शेजारी राहणाऱ्या ४ जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली आणि घराचा दरवाजा तोडून घरातील फरशीची तोडफोड करण्यात आल्याची घटना शिरसोली गावात २८ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी शनिवारी ३ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.