जालना: गुटखा विक्रीवर पोलिसांची कारवाई; गोकुळवाडी येथून महेश धुमाल याच्याकडून 10 हजार 956 रुपयांचा मुद्देमाल जप्त
Jalna, Jalna | Oct 14, 2025 जालना तालुक्यातील गोकुळवाडी येथे पोलिसांनी कारवाई करून शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत पोलिसांनी एक इसमाला ताब्यात घेत त्याच्याकडून सुमारे 10 हजार 956 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती मंगळवार दि. 14 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता पोलीस सुत्रांनी दिली. पोलीस ठाणे जालना येथे दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी पोलीस कर्मचारी हे दि. 13 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास गोकुळवाडी येथे आरोपींचा शोध घेत होते.