अमोल मिटकरी यांचा घनाघाती आरोप : “फेक ट्विट फिरवून मिटकरी आणि पार्थ पवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न” राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अंजली दमानिया यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. “मी जे काही बोललोच नाही ते माझ्या तोंडी टाकून मला बदनाम करण्याचं काम काही विरोधकांकडून सुरू आहे. महायुतीमध्ये आग लावण्याचं काम विरोधकांच्या सोशल मीडियाकडून केलं जात आहे,” असं मिटकरी म्हणाले.ते पुढे म्हणाले, “डॉ. संपदा मुंडे प्रकरणात गप्प असलेल्या अंजली दमानिया यांच्यावर घनघाट टीका केली.