आज सोमवारी सकाळी १० च्या सुमारास सुतारवाडी येथील गीताबाग कार्यालयात रायगड लोकसभा मतदारसंघातील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी खासदार सुनील तटकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सर्वांशी मनमोकळेपणाने संवाद साधत त्यांच्या समस्या, शासकीय कामांशी संबंधित प्रश्न यासह मतदारसंघातील प्रलंबित विकास कामांसदर्भातील माहिती जाणून घेतली. नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक विषयाची गांभीर्याने दखल घेत, संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना या समस्यांवर तात्काळ कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे प्राधान्याने मार्गी लावली जातील, असा विश्वास यावेळी उपस्थितांना दिला.