भद्रावती: बंजारा समाजाला अनुसुचीत जमाती प्रवर्गात घेण्यास विरोध.
आदिवासी विकास परीषदेचे तहसील कार्यालयात निवेदन.
बंजारा समाजाला अनुसुचीत जमाती प्रवर्गात घेण्याच्या मागण्या केल्या जात आहेत. हि मागणी घटनाबाह्य असुन आदिवासी समाजावर अन्याय करणारी आहे.त्याचप्रमाणे राज्याच्या महसूल मंत्र्यातर्फे आदिवासींच्या पडीत जमिनी भाडेतत्वावर घेण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला.या दोन्हीला आदिवासी समाजाचा विरोध असुन बंजारा समाजाला अनुसुचीत जमाती प्रवर्गात घेऊ नये व आदिवासींच्या पडीत जमिनी भाडेतत्वावर देऊ नये या मागणीचे निवेदन आदिवासी विकास परिषदेतर्फे तहसील कार्यालयात सादर करण्यात आले आहे.