राधानगरी: कुंभोज परिसरात बिबट्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
कुंभोज-दानोळी रोडवरील कुंभोज हद्दीतील अमित पोवेकर यांच्या जनावरांच्या गोठ्यात रविवारी दि.१४ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्या आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.बिबट्याचे दर्शन झाल्याचे फुटेज पोवेकर यांच्या गोठ्यात लावलेल्या सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत आहे. बिबट्या बाबुजमाल डोंगराच्या दिशेने जात असल्याचे या व्हिडिओतून स्पष्ट होते.