श्रीवर्धन: रानवली येथे भारत सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हर घर जल अंतर्गत जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेच्या विकासकामाचा उद्घाटन सोहळा
आज शनिवार दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २ च्या सुमारास श्रीवर्धन तालुक्यातील रानवली येथे भारत सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘हर घर जल’ अंतर्गत जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेच्या विकासकामाचा उद्घाटन सोहळा पार पडला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार तुकाराम सुर्वे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ, अधिकारी वर्ग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.