अतिवृष्टीमुळे पिकांचे आणि घरांचे नुकसान, तसेच अपूर्ण कर्जमाफीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी आज तेल्हारा येथे सोयाबीन शासकीय दराने खरेदी करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले. व्यापाऱ्यांकडून अल्प दरात खरेदीमुळे शेतकरी संतप्त असून शासनाने तातडीने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.