अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेतलेली असताना त्याच गुन्ह्यात खुनाच्या प्रयत्नांची कलमवाढ करण्याची मागणी करत एका व्यक्तीने दिघी पोलीस ठाण्यात राडा घातला. पोलिसांना अश्लील शिवीगाळ करत पोलीस ठाण्यात आत्महत्या करण्याची धमकी दिली.याबाबत संबंधित व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (११ डिसेंबर) दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.