वर्धा जिल्ह्यातील देवळी विधानसभेतील वर्धा तालुक्यातील तब्बल ३३ गावांमधील ४८१ अतिक्रमणधारक कुटुंबांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणाच्या भीतीत जगणाऱ्या या कुटुंबांना अखेर हक्काचे अधिकृत पट्टे मिळाले आहेत.दिनांक 2 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास हेरिटेज हॉल वर्धा येथे देवळी–पुलगावचे आमदार राजेश बकाने आणि सुनील गफाट यांच्या हस्ते पट्ट्यांचे वाटप करण्यात आले. या पट्ट्यांमुळे आता संबंधित कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजना तसेच राज्य शासनाच्या विविध