रोहा-अष्टमी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार वनश्री शेडगे यांनी प्रचंड बहुमतांनी विजय संपादन केला. याप्रसंगी आज रविवार दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ च्या सुमारास खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तमाम विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांवर दाखवलेल्या विश्वासबद्दल सर्व रोहा-अष्टमीकरांचे मनःपूर्वक आभार! यावेळी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.