जालना: जालन्यात विनापरवाना गोमांस विक्रीवर पोलिसांची कारवाई; 20 किलो मांसासह साहित्य जप्त; खांडसरी परिसरात छापा
Jalna, Jalna | Jul 2, 2026 जालना शहरातील खांडसरी परिसरात विनापरवाना गोवंशीय मांसाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सदर बाजार पोलिसांनी बुधवारी छापा टाकून 20 किलो संशयित गोवंशीय मांसासह विविध साहित्य जप्त केले. गुरुवार दि. 2 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर बाजार पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी यांनी फिर्याद दिली.