तुमसर नगरपरिषद निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या निवडणुकीत भाजपचे 10 नगरसेवक विजयी झाले. दरम्यान, आज दि.24 डिसेंबर रोज बुधवार ला दुपारी 1 वा. नवनिर्वाचित नगरसेवकांनी माजी आमदार परिणय फुके यांच्या नागपूर येथील निवासस्थानी भेट घेतली. याप्रसंगी नवनिर्वाचित दहा नगरसेवकांचा माजी आमदार परिणय फुके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.