खामगाव: अवैधरित्या देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एका युवकास शहर पोलिसांनी टिळक पुतळा चौक येथे पकडले
अवैधरित्या देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एका युवकास शहर पोलिसांनी टिळक पुतळा चौक १५ ऑक्टोंबर रोजी दुपारी १ वाजेदरम्यान पकडले.खामगांव शहर पोलीस स्टेशनचे पोकॉ अमरदिपसिंह ठाकुर यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे टिळक पुतळा चौक छापा टाकून शिवशंकर गजानन इंगळे वय 26 वर्ष रा.कोलोरी यास पकडले.व त्याच्या ताब्यातून पोलिसांनी देशी दारू १०० नग शिष्या व वायरची थैली जप्त.