माहूर: टी पॉईंट येथे बस समोर मोटर सायकल आडवी करून शासकीय कामात अडथळा निर्माण ककेल्या प्रकरणी माहूर पोलिसात गुन्हा नोंद
Mahoor, Nanded | Sep 30, 2025 दि. 29 सप्टेंबर रोजी सकाळी 7:45 च्या सुमारास माहूर शहरातील टी पॉईंट येथे आरोपी अर्जुन प्रकाश पवार वय 19 याने फिर्यादी प्रकाश गिते हे शासकीय काम करत असताना बस समोर मोटरसायकल लावून शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता. याप्रकरणी फिर्यादी प्रकाश गिते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माहूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि जाधव हे करत आहेत.