खामगाव: रायगड काँलनी येथून ७० वर्षीय वयोवृद्ध महिला बेपत्ता
शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद
रायगड काँलनी येथून ७० वर्षीय वयोवृद्ध महिला बेपत्ता झाल्याची घटना १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेदरम्यान उघडकीस आली आहे.रायगड काँलनी येथील ठकुबाइ तुळशीराम घुले वय ७० वर्ष ही वयोवृद्ध महिला बेपत्ता झाली. ती उशिरापर्यंत घरी परत न आल्याने तिचा नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता ती कुठेच मिळून आली नाही.यामुळे याबाबत नातेवाईकांनी शहर स्टेशनला तक्रार दिली तक्रारीवरून पोलिसांनी हरविल्याची नोंद केली आहे.