जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या युवकावर पोलिसांनी मोठी कारवाई करत काल दि 5 डिसेंम्बर ला 8 वाजता देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत कारतुस जप्त केले. स्थानिक गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी हाती घेतलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. आरोपीविरुद्ध हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे नगर वार्ड, बल्लारपूर येथील रहिवासी ईस्माईल उर्फ नवाब युसुफ शेख (वय 30) असे आरोपी चे नाव आहे.