अलिबाग: कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेविषयी जनजागृती
जिल्हा विधी प्राधिकरण व जिल्हा न्यायालय अलिबाग तर्फे विशेष कार्यक्रम
Alibag, Raigad | Sep 18, 2025 कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, प्रतिषेध व निवारण कायदा 2013 (POSH Act) तसेच संबंधित कायदेशीर तरतुदींच्या अंमलबजावणीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने अलिबाग जिल्हा न्यायालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड यांच्या पुढाकाराने करण्यात आले.अध्यक्षीय भाषण वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड सचिव, तेजस्विनी निराळे यांनी केले.