वर्धा: वर्धा जिल्हा ज्युदो असोसिएशनचा सुयाश : सात खेळाडूंचा राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड : सर्व स्तरातून कौतुक
Wardha, Wardha | Oct 26, 2025 वर्धा जिल्हा ज्युदो असोसिएशनच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी करत वर्धा जिल्ह्याचा मान उंचावला आहे. भोपाळ येथे दिनांक 23 ते 26 ऑक्टोबर 2025 दरम्यान विद्याभारती अंतर्गत झालेल्या SGFI मान्यताप्राप्त अखिल भारतीय राज्य ज्युदो व कुस्ती स्पर्धेत वर्धा जिल्हा असोसिएशनच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले.