साक्री: साक्री तालुक्यातील ३४ गणांसाठी अखेर आरक्षण जाहीर;साक्री तहसील कार्यालयात पार पडली सोडत प्रक्रिया
Sakri, Dhule | Oct 13, 2025 साक्री पंचायत समितीच्या ३४ गणांसाठी साक्री तहसील कार्यालयात सोमवारी १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता आरक्षण सोडत काढण्यात आली. उपजिल्हाधिकारी (रोहयो) बालाजी क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रभारी तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. यावेळी निवासी नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर उपस्थित होते.पाच वर्षीय बालक कृष्णा गवळी याच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली. आरक्षण सोडत प्रक्रियेसाठी भाजपा, काँग्रेस, राष्ट्