रत्नागिरी : प्राथमिक आरोग्य केंद्र जवळेथर येथे क्ष-किरण तपासणी शिबीराचे आयोजन....
375 views | Ratnagiri, Maharashtra | Aug 6, 2025 जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ महेंद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात टि बी मुक्त भारत मोहीम यशस्वीपणे राबविली जात आहे.या अनुषंगाने दि.05/08/2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र जवळेथर ता. राजापूर येथे एक्स रे कॅम्प चे आयोजन केले होते.उपकेंद्र आजिवली,हातदे, मुर काजीर्डा,ताम्हाणे मधील 8 ग्रामपंचायत अंतर्गत 16 गावांतून एकुण 238 संशयित रुग्णांचे x- रे करण्यात आले.याप्रसंगी जिल्हयाची एक्स -रे टीम, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य उपस्थित होते.शिबिराच्या आयोजनाबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व सर्व आरोग्य कर्मचारी, गटप्रवर्तक,आशा स्वयंसेविका,क्लर्क या सर्वांचे मोलाचे योगदान लाभले.