सातारा: भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांचे वक्तव्य अयोग्य; विषय समितीत मांडणार : मंत्री शंभूराज देसाई
Satara, Satara | Nov 28, 2025 भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे या वक्तव्यामुळे महायुतीत नव्या चर्चांना उधाण आले आहे. नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असे विधान करणे अयोग्य असल्याची प्रतिक्रिया महायुती समन्वय समितीचे सदस्य व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली.शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटले की, सध्या राज्यात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस अशी महायुती आहे.