उत्तर सोलापूर: सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर आरबीआयचे निर्बंध; ग्राहकांमध्ये गोंधळ, अध्यक्ष दिलीप अत्रे यांनी दिली महत्त्वाची माहिती
सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) काही आर्थिक निर्बंध लादल्याने ग्राहकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. बँकेच्या विविध शाखांमध्ये खातेदारांनी रांगा लावून आपल्या ठेव रकमेबाबत चौकशी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे यांनी ग्राहकांना बुधवारी दुपारी 3 वाजता पत्रकारांशी बोलताना आवाहन केले आहे की, "बँकेची आर्थिक स्थिती स्थिर करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत.