कामठी: कामठी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 : या तीन प्रभागांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर
Kamptee, Nagpur | Nov 30, 2025 नगरपरिषद कामठी सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभाग क्रमांक दहा अ, प्रभाग क्रमांक 11 ब आणि प्रभाग क्रमांक 17 ब येथील उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्र छाननी संदर्भात दाखल झालेल्या अपीलामुळे सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आज प्राप्त झालेल्या परिपत्रकाच्या अनुषंगाने या तीन प्रभागांमधील जागेसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.