श्रीगोंदा–टाकळी कडेवळी रस्त्यासाठी संभाजी ब्रिगेडचे आमदारांना निवेदन श्रीगोंदा–टाकळी कडेवळी हा इंधन व वेळ वाचवणारा तसेच सिद्धटेककडे जाणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून त्याची अवस्था सध्या अतिशय खराब आहे. या रस्त्याचे काम तातडीने हाती घ्यावे, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडने आज दुपारी एक वाजता आ. विक्रम पाचपुते यांना निवेदन दिले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रस्त्यावरील पुलांची कामे पूर्ण झाली असतानाही रस्ता अरुंद व खड्डेमय असल्याने वाहतूक कोंडी व अपघात वाढले आहेत.