भंडारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन अड्याळ हद्दीतील केसलवाडा येथे शेतशिवारात अवैधरित्या मोहफुल हातभट्टी दारू गाळप अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दि. ८ जानेवारी रोजी पोलिसांनी हातभट्टी दारू गाळप अड्ड्यांवर छापा घालून हातभट्टी उधळून लावली. पोलिसांनी केसलवाडा येथील आरोपी हिरालाल बारसागडे वय ५८ वर्षे यांच्या ताब्यातून १ लाख २६ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात ६०० किलोग्रॅम सडवा मोहपास लोखंडी, ड्रम जलाऊ काड्या व विविध साहित्यांचा समावेश आहे. याप्रकरणी सदर आरोपीवर पोलीस स