दिग्रस: तहसिल कार्यालयात निवडणूक तयारीचा कर्मचाऱ्यांना थकवा; कर्मचाऱ्यांना जेवायला वेळ मिळत नसल्याने कर्मचारी तहसिल आवारात जेवले
दिग्रस नगर परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तहसिल कार्यालयात निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यासाठी विशेष निवडणूक कक्ष स्थापन करण्यात आला असून, विविध विभागातील कर्मचाऱ्यांची ड्युटी तहसिल कार्यालयात लावण्यात आली आहे. दरम्यान, निवडणुकीसाठीची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू असल्याने कर्मचाऱ्यांना जेवणासाठीही वेळ मिळत नाही. निवडणूक विभागाकडून नाश्ता किंवा जेवणाची कोणतीही व्यवस्था न झाल्याने, एका कर्मचाऱ्याने दुपारी ४ सुमारास तहसिल कार्यालयातच घरून आणलेले डब्बा उघडून जेवण करताना दिसले.