सहकार क्षेत्राला अधिक बळकटी देण्याच्या आणि ग्राहकांना अत्याधुनिक व तत्पर सेवा पुरवण्याच्या उद्देशाने, 'दि विदर्भ प्रिमियर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., नागपूर' च्या काटोल शाखेचा स्थानांतरण व नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.सहकार क्षेत्रातील ही नामांकित संस्था आता काटोल शहरात अधिक सक्षमपणे आपल्या सेवा विस्तारत असून, या नवीन शाखेमुळे स्थानिक नागरिकांना गृहकर्ज आणि इतर वित्तीय सेवा मिळणे अधिक सुलभ होणार आहे