धरणगाव नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत महाराष्ट्र जनविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, शहरात आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मोमीन अब्दुल वशीर मोहम्मद सादीक यांनी अधिकृतपणे विलास महाजन यांना आपला पाठिंबा जाहीर केल्याची माहिती माजी जी.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी शुक्रवारी 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता दिली.