चंद्रपूर: ताडोबाचा किंग 'छोटा मटका' दीर्घकालीन उपचारासाठी गोरेवाडा केंद्रात
बुद्ध पौर्णिमेच्या रात्री ब्रम्हा (T-158) वाघाचा खात्मा करून स्वतः गंभीर जखमी झालेला ताडोबाचा किंग छोटा मटका (T-126) याला चंद्रपूर ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधून नागपूरच्या गोरेवाडा बचाव व पुनर्वसन केंद्रात आज दि 14 सप्टेंबर 12 वाजता हलविण्यात आले आहे. गोरेवाडा येथे त्याच्यावर दीर्घकालीन उपचार केले जाणार आहेत.छोटा मटकाचे वय दहा वर्षे असून त्याचे व्यक्तिमत्त्व देखणे व भव्य आहे. मात्र अलीकडील लढाईत तो गंभीर जखमी झाला.