यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन–तीन दिवसांपासून थंडीची लाट अधिक तीव्र झाली आहे. सकाळच्या वेळची दाट धुके आणि दिवसभर वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे नागरिक अक्षरशः थंडीने कुडकुडत आहेत. जिल्ह्यातील किमान तापमान तेरा ते चौदा अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरल्याची नोंद आहे. अचानक वाढलेल्या गारठ्यामुळे प्रतिकारशक्तीवरही परिणाम होऊ शकतो, असा तज्ज्ञांचा इशारा. उबदार कपडे वापरा, थंड पाणी टाळा, गरम पाणी प्या, रात्री बाहेर जाणं कमी करा आणि योग्य आहार घ्या — असा