निलंगा: नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने निलंगा पोलिसांचा कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व्यापक रूट मार्च
Nilanga, Latur | Nov 30, 2025 नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका 2025 पार्श्वभूमीवर लातूर पोलिसांचा व्यापक रूट मार्च. मतदान व मोजणी प्रक्रिया निर्विघ्न पार पडण्यासाठी 500 पेक्षा अधिक पोलिस अंमलदार, 45 पोलीस अधिकारी, SRPF चे 06 सेक्शन व होमगार्डसह तगडा बंदोबस्त. लातूर जिल्ह्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुका 2025 निमित्ताने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लातूर पोलिस प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे.