जळगाव: ग्रामपंचायतींमध्ये विकासाची स्पर्धा; 'समृद्ध पंचायतराज अभियान' सुरू; मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची माहिती
राज्याच्या प्रत्येक ग्रामपंचायतीला सर्वार्थाने समृद्ध करण्यासाठी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अभियानाअंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना चक्क एक कोटी रुपयांपर्यंतचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी मंगळवारी १६ सप्टेंबर सायंकाळी ६ वाजता पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.