गेवराई पोलीस दलाने चोरीस गेलेले व हरवलेले मोबाईल शोधून काढत नागरिकांना परत मिळवून दिले आहेत. अशी माहिती मंगळवार दि.23 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता प्रसार माध्यमातून दिली. या कारवाईत एकूण १५ मोबाईल मालकांना परत करण्यात आले आहेत.हा उपक्रम बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके आणि पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सखोल तपास व तांत्रिक विश्लेषणा