उत्तर सोलापूर: अन्यथा २० ऑक्टोबरला वर्षा बंगल्यासमोर सीना नदीच्या पाण्याने अंघोळ आंदोलन करणार: सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटलांचा इशारा..
सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांचे ऊस, उडीद, सोयाबीन, कांदा आणि मका पिकांचे अतिवृष्टी व पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल आबाजी पाटील यांनी मंगळवारी सायं 5 वाजता पत्रकारांशी बोलताना केली आहे. त्यांनी ऊसासाठी एकरी ₹८० हजार, उडीद-सोयाबीन-कांदा पिकासाठी एकरी ₹५० हजार, मका पिकासाठी ₹४० हजार, तर घर, कोटा आणि मोटार नुकसानीसाठी स्वतंत्र मदत देण्याची मागणी केली आहे.