पुणे शहर: शिवाजीनगर भुयारी मार्गात तरुणाची फसवणूक; ३४ हजारांचे दोन मोबाईल लंपास.
Pune City, Pune | Oct 18, 2025 – शिवाजीनगर येथील संत मोरया गोसावी भुयारी मार्गात रात्री सात ते साडेदहा वाजण्याच्या दरम्यान तरुणाची फसवणूक करून दोन मोबाईल चोरी झाल्याची घटना घडली. कोंढवा येथील २० वर्षीय तरुणास दोन अनोळखी इसमांनी दुचाकीचा धक्का लागल्याचा बहाणा करत बोलण्यात गुंतवले. दरम्यान, त्यांनी त्याच्या खिशातील एकूण ३४ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल चोरले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत.