पालघर: बोईसर येथे दुचाकीच्या अपघातात एक जण जखमी; गुन्हा दाखल
बोईसर पोलीस ठाणे हद्दीतील तारापूर औद्योगिक क्षेत्र परिसरात जगणंंदन सोनी चालत जात असताना समोरून आलेल्या भरधाव वेगातील दुचाकीने त्यांना धडक दिली. या अपघातात सोनी गंभीर जखमी झाले. दुचाकीस्वार मात्र घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकी स्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.