जळगाव शहरातील खंडेराव नगर परिसरात राहणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेचा हात पकडून अश्लिल चाळे करत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी १७ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.