येथील आ. मुनगंटीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात गोंडवाना गणतंत्र पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) व माजी सरपंच गणपतजी नैताम यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आज दि 26 ऑक्टोबर 2 वाजता भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी निंबाळा ग्रामपंचायत सदस्य सौ. वैशाली नेताम, अर्चनाताई कोटरंगे, हरीदास निकुरे, माजी ग्रामपंचायत सदस्य अर्चना नैताम आणि अहिल्याताई किन्नाके यासह बोर्डा जिल्हा परिषद क्षेत्रातील गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला.