परभणी: पाच महिन्याच्या थकीत वेतनासाठी मनपा कर्मचाऱ्यांचे मनपा कार्यालया समोर कामबंद आंदोलन सुरू
महापालिकेतील कर्मचार्यांना गेल्या पाच महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे कर्मचारी वर्गात तीव्र असंतोष निर्माण झाला असून वेतनाअभावी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. थकीत वेतनाच्या मागणीसाठी मनपा कर्मचाऱ्यांनी आज बुधवार 8 ऑक्टोबर पासून बेमुद्दत काम बंद सुरू केले असून आज दुपारी 2 वाजता ही मनपा कार्यालयासमोर मनपा कर्मचाऱ्यांचे तीव्र आंदोलन सूर असून जो पर्यंत वेतन अदा होणार नाही तोपर्यंत बेमुद्दत काम बंद आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे.