कळमनूरी: डोंगरकडा येथे एसटी बस थांबा फलकाचे थाटात उद्घाटन
कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे राज्य परिवहन महामंडळाच्या साध्या बस सह जलद बसला थांबा मिळाल्याने आज दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सकाळी डोंगरकडा पोलीस चौकीचे जमादार संतोष नागरगोजे यांच्या शुभहस्ते फित कापून बस थांबा फलकाचे उद्घाटन मोठ्या थाटात करण्यात आले आहे .याप्रसंगी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .