गोंदिया: राज्यात 15,158 शिक्षक पदे रिक्त,जिल्हा परिषद शाळांना कुलूप लागण्याची शक्यता....आमदार नाना पटोले यांनी वेधले सदनाचे लक्ष
राज्यात 15,158 शिक्षक पदे रिक्त आहेत.असे खुद्द मंत्रीमहोदयानी सभागृहात सांगितले.अनेक जि.प.शाळांना कुलूप लागले आहे. शिक्षक उपलब्ध नाहीत.शैक्षणिक वर्ष संपत आले असताना विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.अनेक शाळांमध्ये आजही केवळ 10ते20 टक्केच शिक्षक कार्यरत आहेत.अशा परिस्थितीत सरकार विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलत आहे.सरकारचे सध्याचे शैक्षणिक धोरण हे गरिबांच्या,सामान्य नागरिकांच्या मुलांच्या भवितव्याशी खेळ खेळत आहे.कायम बंद असलेले पवित्र पोर्टल सुरू कधी करणार असा प्रश्न उपस्थित केला.