नागपूर ग्रामीण: नागपूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; गांजा आणि शस्त्रासह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणच्या पथकाने एमआयडीसी बोरी रोडवर सापळा रचून एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत अंमली पदार्थ आणि बेकायदेशीर अग्निशस्त्र जप्त करण्यात आले आहे.याप्रकरणी विजय भिक्कुजी महाकाळकर याला अटक करण्यात आले असून १.११४ किलो गांजा, एक भरमार बंदूक, ह्युंदाई आय-२० कार, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ६,०४,६४० रुपयांचा माल जप्त केला.