खंडाळा: पारगाव येथून दि. ३ ऑक्टोबर रोजी चोरीला गेलेला ट्रॅक्टर इंदापूरात पोलिसांना सापडला
पारगाव येथून दि. ३ ऑक्टोबर रोजी चोरीला गेलेला ट्रॅक्टर इंदापूरात पोलिसांना सापडला सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील पारगाव येथे शहीद सुनील यादव स्मारकासमोरुन दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता अज्ञात चोरट्याने ट्रॅक्टर क्रमांक एमएच ११ डीएन ५१६५ हा चोरुन नेला होता. तो ट्रॅक्टर इंदापूर पोलिसांनी दि. ४ ऑक्टोबर रोजी शोधून काढला असून चोरट्यास पोलीस खंडाळा पोलीस ठाण्यात घेवून येत आहेत.